धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षामध्ये काम करून पक्षाची धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी यांनी काम केले आहे. तसेच पक्षाच्या वारंवार होणाऱ्या बैठका व मेळाव्यासाठी देखील अनेक कार्यकर्त्यांना सामील करून पक्षाचे काम वाढविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्याच्या कामाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोनटक्के यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडीचे नियुक्ती पत्र प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आ राणाजगजितसिंह पाटील, प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड व भाजपा जिल्हा समन्वयक नेताजी पाटील आदी उपस्थित होते. ऐन विधानसभा निवडणुकी दरम्यान सोनटक्के यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


 
Top