धाराशिव  (प्रतिनिधी) - शहरातील ठाकरेनगर नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने गुरुवार दि.३ ऑक्टोबर रोजी श्रीक्षेत्र येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदिरातून भवानी ज्योत आणून देवी मातेची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करीत नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला. तर दि.१७ ऑक्टोबर रोजी भव्य छबीना मिरवणुकीने या महोत्सवाची सांगता अतिशय आनंदी, उत्साही व भक्तिमय वातावरणात गुरुवार दि. १७ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आली.

धाराशिव शहरातील ठाकरे नगर येथील नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने गेल्या २३ वर्षांपासून नवरात्र महोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची परंपरा अखंडपणे सुरु आहे. या मंडळाचे संस्थापक तथा मार्गदर्शक प्रशांत (बापू) साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  नवरात्र महोत्सव काळातील सर्व कार्यक्रमांचे नियोजन नारीशक्तीच्या हाती सोपविण्यात आले होते. कोजागिरी पौर्णिमेदिनी येडेश्वरी मातेच्या छबिन्याची विधीवत आरती व पूजा महिलांच्या हस्ते करून मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. ही मिरवणूक बाळासाहेब ठाकरे नगर, शाहू नगर या भागातून फटाक्यांची आतषबाजी, संबळ, ढोल ताशा व डीजेच्या दणदणाट काढण्यात आली. तर निवडणुकीत फुलांची व कुंकवाची उधळण मोठ्या प्रमाणात करण्यात आली. तसेच आराधी व भाविक महिला व पुरुष पोत खेळत महिला, युवक, युवती व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उदे ग अंबे उदे.... आदींसह विविध देविच्या गाण्यांवर भाविकांनी ठेका धरीत या मिरवणुकीत उत्साह, आनंद व रंगत आणली. यावेळी महिला व युवतींनी..  नारी शक्ती वोब होती तो तुम न होते...मुस्कुराकर दर्द भुलाकर, रिश्तो में बंद थी दुनिया.... नारी हर पथ को रोशन करनेवाली वो शक्ती है एक नारी...हाती घेतलेले फलक खऱ्या अर्थाने नारीचा म्हणजेच महिलांचा सन्मान करणारे तर होतेच. परंतू हेच या मिरवणुकीतील मुख्य आकर्षण देखील ठरले.

यावेळी मंडळाचे संस्थापक प्रशांत साळुंके, नवरात्र महोत्सवाच्या आधारस्तंभ शामल साळुंके, अध्यक्षा सुरेखाताई खांडेकर, उपाध्यक्षा सत्यशीला गायकवाड, सचिव प्रतिभा गाडे, लता इंगळे, श्रद्धा उगलमोगले, शिवानी कोळी, योगिता निलंगे, कोमल कदम, वर्षा डोके, मीनाक्षी महामुनी, मंगल सलगर, निकिता सिरसट, दीपाली चौधरी, रेखा शिंदे, दीपाली गायकवाड, रुक्मिणी सुर्यवंशी, सुरेखा पवार, अनारकली शिंदे, सत्यभामा खोत, शितल कसपटे, इंदू जगताप, लता राठोड, शुभांगी काळे, राणीताई काळे, अनिताताई शेंडगे, विमल साठे, योजनाबाई सलगर, अर्चना सोनटक्के, पूजा वाघमारे यांच्यासह मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी, भाविक व आराधी मंडळाच्या सदस्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी अध्यक्ष प्रशांत साळुंके म्हणाले की, या मंडळाच्या माध्यमातून नवरात्र उत्सव दरम्यान संगीत खुर्ची, खेळ पैठणीचा होम मिनिस्टर, चित्रकला स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा, दांडपट्टा, कराटे आदी समाज उपयोगी व महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम घेऊन सामाजिक दायित्व निभावण्याचा प्रयत्न केला आहे. यापुढे देखील असेच विविध कार्यक्रम राबवून महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे साळुंके यांनी सांगितले.


 
Top