भूम (प्रतिनिधी)- ज्येष्ठ कवयित्री, लेखिका प्रा. अलका सपकाळ यांना लोकशिक्षक बाबा भारतीय प्रतिष्ठान, पुणे यांचा साहित्य प्रतिभा पुरस्कार 2024 फुलांची शाळा या साहित्यकृतीस प्रदान करण्यात आला. प्रा. सपकाळ या सजग समाजभान असलेल्या साहित्यिक, कवयित्री असून कृतिशील सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी आपल्या साहित्याद्वारे शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित वंचित महिला यांच्या वेदनांना शब्दरूप दिले आहे. विविध अंगी लेखन करून साहित्य क्षेत्रात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला आहे.
हा सोहळा इस्लामपूर, सांगली येथे 89 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते व अण्णासाहेब डांगे माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थित करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून शामराव पाटील, बी. एस. पाटील, डॉ.महेश देवकर, महेश भारती, पुरुषोत्तम सदाफुले, कवी रमजान मुल्ला उपस्थित होते . या पुरस्काराबद्दल प्रा.सपकाळ यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.