धाराशिव  (प्रतिनिधी) - धाराशिव शहरात नगर परिषदेच्या साईट प्लॅन व नाहरकत प्रमाणपत्रानुसार कामे न करता नगर परिषदेच्या विकास कामात समाविष्ट असलेल्या अक्षांश व रेखांश न वापरता अर्ध्या रोडची कामे करून गुत्तेदार जगविण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे ती कामे नगर परिषदेच्या साईट प्लॅन व ना हरकत प्रमाणपत्रानुसार करण्यात यावीत. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहर संघटक प्रशांत साळुंके यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दि.7 ऑक्टोबर रोजी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग, उपकार्यकारी अभियंता हे नगर परिषदेच्या साईट प्लॅन व ना हरकत प्रमाणपत्रानुसार काम न करता नगर परिषदेच्या विकास कामात समाविष्ट असलेल्या  रोड चे काम अक्षांश व रेखांश न वापरता अर्ध्या रोडची कामे करून गुत्तेदार जगविण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून एका गल्लीतील रोडचे पूर्ण काम देखील होत नाही. तर ते तुकडे पाडून अर्धे नागरिक खुश व अर्धे नागरिक नाराज करून गुत्तेदार जगविण्यासाठी काम करीत आहेत. त्यामुळे आमदार कैलास पाटील यांच्या बैठकीत  जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे तात्काळ त्याची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात यावेत. अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभाग, उपकार्यकारी अभियंता कार्यालय 1 विभागासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा साळुंके यांनी दिला आहे.

 
Top