धाराशिव (प्रतिनिधी) -येरमाळा येथील आई येडेश्वरीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सोमवारी (दि.7) पाचवी माळ असल्यामुळे भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पाचव्या माळे दिवशी गावातील आणि पंचक्रोशीतील हजारो भाविक मंदिराला खेटा घालण्यासाठी येतात. नवरात्रीच्या काळात गावातील भक्त आणि अनेक मंडळ दररोज सकाळी भाविकांना उपवासाचे पदार्थ वाटप करीत असतात. सोमवारी सकाळी आई येडेश्वरी मित्र मंडळ आणि संजय पाटील दुधगावकर परिवार यांच्याकडून केळी, डिंक लाडू, शेंगदाणा लाडू मंदिराच्या पायथ्याशी भाविकांना वाटप करण्यात आले. यावेळी संजय पाटील दुधगावकर, दिपक बारकुल, बालाजी बारकुल, तानाजी बारकुल, दत्ता डाळे, राजकुमार निचळे, अमरजीत बारकुल, सुधीर देशमुख, सुधीर लोमटे आदी उपस्थित होते.