धाराशिव (प्रतिनिधी)- 242 - उस्मानाबाद आणि 243 - परंडा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 करीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (सामान्य) गोपाल चंद, (भा.प्र.से.) यांचे आज जिल्हयात आगमन झाले आहे.त्यांचा मुक्काम व कार्यालय शासकीय विश्रामगृह, शिंगोली येथील वेरुळ या सूटमध्ये आहे. तसेच त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02472-234136 हा असून त्यांचा भ्रमणध्वनी नंबर 9021555349 हा आहे.