धाराशिव (प्रतिनिधी)- 242 उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नियुक्त केलेल्या इतर मतदान अधिकारी यांचे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह नगरपरिषद धाराशिव व हातालनी प्रशिक्षण जिल्हा परिषद कन्या प्रशाला शहर पोलीस स्टेशन जवळ धाराशिव येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये 111 कर्मचारी गैरहजर राहिले आहेत.
सदर प्रशिक्षणासाठी इतर मतदान कर्मचारी म्हणून 1162 कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली होती. पैकी प्रशिक्षणासाठी 1151 उपस्थित होते. तर 111 गैरहजर होते. यासंदर्भात प्रशासन का कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.