तुळजापूर (प्रतिनिधी)-   तुळजापूरात गेली आठ दिवसापासुन होत असलेल्या दुषित पाण्या पुरवठ्यामुळे अनेक नागरिक, लहान मुले आजारी पडत असल्याने यांच्या जिवीतास धोका निर्माण झाल्याने मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर यांच्यावर गुन्हा नोंद करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पक्ष शहर शाखेने जिल्हाधिकारी यांना तहसिलदार तुळजापूर मार्फत निवेदनाद्वारे केली  आहे.

गेली आठ दिवसापासुन तुळजापूर शहरास दुषित पाणीपुरवठा होत आहे. दुषित पाणी पुरवठ्यामुळे शहरातील नागरीकांचे तसेच लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकजण आजारी पडलेले आहेत. त्यामुळे तुळजापूर शहरवाशीयांचे आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.तरी याबाबत तात्काळ चौकशी करण्यात यावी व मुख्याधिकारी नगर परिषद तुळजापूर, संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांच्यावर नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष किरण माणिकराव यादव यांनी दिले.

 
Top