नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथे दि. 1 ऑक्टोबर रोजी काशी पीठाचे जगद्गुरू श्री. श्री. श्री. 1008 डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची आड्ड पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. यावेळी कुंभ मिरवणुकही काढण्यात आली या कुंभ मिरवणुकीत डोक्यावर कलश घेऊन शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत हिंदु बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ऐतिहासिक नळदुर्ग नगरीत शारदीय नवरात्र महोत्सवात नवरात्रीच्या पहिल्या दिवसांपासुन ते विजयादशमीपर्यंत अंबाबाई मंदिरात अंबाबाईसमोर महान तपस्वी श्री बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज हे आपल्या छातीवर घटस्थापना करून लोक कल्याणसाठी अनुष्ठान करणार आहेत. या अनुष्ठानात संपुर्ण दहा दिवस अन्न -पाणी व सर्व नैसर्गिक विधीचा त्याग करून एकाच आसनामध्ये दहा दिवस राहुन श्री महेश्वरानंद महाराज तपस्या करणार आहेत. दि. 3 ते 12 ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या या अनुष्ठानाचा शुभारंभ दि.1 ऑक्टोबर रोजी काशी पीठाचे जगद्गुरू श्री. श्री. श्री.1008 डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य  महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी काशी पीठाचे जगद्गुरू श्री. श्री. श्री.मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे नळदुर्ग शहरातील मल्लिकार्जुन मंदिरात आगमन झाले. याठिकाणी जगद्गुरूंचे हिंदु बांधवांनी दर्शन घेतले. यावेळी नागनसुर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी,नळदुर्ग येथील शिवलिंगेश्वर हिरेमठाचे श्री ष. ब्र. बसवराज शिवाचार्य महास्वामीजी व महान तपस्वी बालयोगी परमहंस महेश्वरानंद महाराज आदीजन उपस्थित होते.

यावेळी जगद्गुरू श्री. श्री. श्री. 1008 डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची आड्ड पालखीतुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. मल्लिकार्जुन मंदिर ते अंबाबाई मंदिरापर्यंत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. मिरवणुकीदरम्यान मिरवणुक मार्गावरील प्रत्येक चौकात जगद्गुरूंचे दर्शन घेण्यासाठी हिंदु बांधवांनी मोठी गर्दी केली होती. मिरवणुक अनुष्ठानच्या ठिकाणी अंबाबाई मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले यानंतर जगद्गुरूंच्या उपस्थितीमध्ये अंबाबाई मंदिर सभागृहात धर्मसभा पार पडली या कार्यक्रमास हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नळदुर्ग शहर सकल हिंदु समाज बांधवांनी परीश्रम घेतले.


 
Top