तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील, पापनास जवाहार गल्ली येथील सुप्रसिद्ध विरक्त मठ /वीरशैव जंगम मठ येथे सुमारे 80 वर्षापासून वास्तव्य असलेले सेवेकरी प्रभूलिंग गणपतराव स्वामी व त्यांच्या कुटुंबीयांना अचानकपणे विश्वस्तांनी बेघर करण्याचा प्रयत्न केला. अचानकपणे प्रभूलिंग स्वामी यांना कुठलीही कायदेशीर नोटीस न बजावता मठातून हुसकावून लावून बेघर करण्याचा प्रयत्न केला.
असता त्यांनी न्यालयात धाव घेतली असता तुळजापूर न्यायालयाने जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिला.
या बाबतीत अधिक मठाच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मठातील प्राचीन समाधी, शिवमंदिर व मठाचे पिढीजात सेवेकरी राहत असलेले निवासस्थान पाडण्याचा प्रयत्न विश्वस्थांनी सुमारे एक महिन्यापासून सुरू केला होता. या प्रकरणी स्वतःचे निवासस्थान व मठातील लिंगायत समाजाची आस्था असलेल्या अन्य इमारती वाचवण्यासाठी प्रभूलींग स्वामी यांनी तुळजापूर येथील मे. धाव घेतली. मे न्यायालयाने ही परिस्थितीचे गांभीरे ओळखून मठातील पाडकामस 'जैसे थे' चा आदेश दिला. सदरील न्यायालयातील कामकाज वादींच्या तर्फे सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट मधील सुप्रसिद्ध ॲड नितीन कलशेट्टी, सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध ॲड जयसिंह चेळेकर, धाराशिव येथील प्रसिद्ध ॲड श्रीकांत लोमटे व तुळजापूरचे ॲड धर्मराज सरडे यांनी कामकाज पाहिले.