धाराशिव (प्रतिनिधी)- विकसित भारतामध्ये सिव्हिल इंजीनियरिंग विभागाचा  खूप मोठा वाटा असून यामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहेत. याचाच एक भाग म्हणून येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच रिलायन्स मॉल धाराशिव येथे भेट दिली. प्रत्यक्षात प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये भर देण्याकरीता “ कास्टिंग ऑफ स्पेशलाईज्ड बीम विथ मायक्रो काँक्रेटींग टेक्नॉलॉजी “ या नवीन अश्या काँक्रिट टेक्नॉलॉजीचा वापर सद्य परिस्थितीत कसा होत आहे हे प्रत्यक्षात जाणून घेतले. बऱ्याच वेळेस हेवी डिझाईन आणि जास्त लोड असल्या कारणामुळे काँक्रिट करता येत नाही. आशा वेळेला पावर ग्राउंट आणि 10 ची खडी वापरून मायक्रो काँक्रीट विथ सेल्फ कॉम्पॅक्शन केले जाते.

या भेटी दरम्यान या साईटचे अभियंता गिरी यांनी साईटवर सुरू असलेले वेगवेगळया प्रकारचे काम आणि त्या अनुषंगाने साईटवर लागणारे डिझाईन्स, टेक्निकल बाबी यांची माहिती दिली. तसेच या दरम्यान उल्ट्राटेक सिमेंट कंपनी मार्फत मुलांना साईट वरती करता येणाऱ्या मेटेरीयल टेस्ट या संदर्भात प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करून दाखवले.

या प्रोजेक्ट जागेचे मालक कुलकर्णी यांनी देखील मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने म्हणाले की, सिव्हिल सारख्या क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या अनेक संधी असून विद्यार्थ्यांना डिग्री बरोबर प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये भर पडावी म्हणून वर्षभर विविध प्रोजेक्टवर विद्यार्थ्यांना भेटीचे नियोजन केले जाते. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चित होतो. सिव्हिल विभाग प्रमुख प्रा.शितल पवार यावेळी म्हणाले की, विकसित भारतात बांधकाम क्षेत्राला अनन्य साधारण महत्त्व असून आमच्या विद्यार्थ्याकडून नक्कीच या क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. म्हणून कौशल्यावर आधारित प्रॅक्टिकल माहिती व्हावी म्हणून या भेटीचे नियोजन केलेले आहे. या साईट व्हिजिट दरम्यान सिव्हिल विभागांतील सर्व विध्यार्थी आणि शिक्षक वर्ग  हजर होता.

 
Top