धाराशिव (प्रतिनिधी) -  सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक कसबे तडवळा येथील रहिवासी असलेले देवदत्त मोरे यांना धाराशिव विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाले आहे. 

धाराशिव कळंब या मतदार संघात महाविकास आघाडीच्याकडून शिवसेनेने विद्यमान आमदार कैलास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीने या मतदारसंघात अद्याप उमेदवाराची घोषणा केली नसल्यामुळे नागरिकांना उत्सुकता लागलेली आहे. असे असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी पाचव्या यादीमध्ये धाराशिव मतदार संघासाठी उद्योजक देवदत्त मोरे यांची अधिकृत उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे मनसेच्या गोठात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गोरे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात मनसैनिकांना नवचैतन्य मिळून पुन्हा ते जोमाने निवडणुकीच्या कामासाठी लागणार आहेत.

 
Top