धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील स्वप्न विहार कॉलनीतील आशालता लक्ष्मण अंधारे (वय 77 वर्षे) यांचे दि.5 ऑक्टोबर रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर कपिलधारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या भक्ति मेडिकलचे संचालक व आपले समूहचे सदस्य संदीप अंधारे व पॉलीटेक्निक कॉलेजचे प्राचार्य सुनील अंधारे व शैलेश अंधारे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली,जावाई, सुना व नातवंड आहेत.