धाराशिव  (प्रतिनिधी)- उमेदवारांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल केल्याच्या दिनांकापासून ते निवडणूक निकाल लागेपर्यंतचा दिनांक धरून केलेल्या खर्चाचे स्वतंत्र व अचूक लेखे/नोंदवह्या ठेवणे बंधनकारक आहे.या खर्चविषयक नोंदवहया/लेखे यांची तपासणी निवडणूक निरीक्षक (खर्च) अलूरू व्यंकट राव हे करणार आहे.संपूर्ण प्रचार कालावधीत किमान तीन वेळा तपासणी करून घेणे अनिवार्य आहे.त्यांच्या तपासणीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहे.

पाहिली पहिली तपासणी 7 नोव्हेंबर रोजी दुसरी तपासणी 13 नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी 19 नोव्हेंबर रोजी आहे ही तपासणी जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह धाराशिव येथे येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता दरम्यान करण्यात येणार आहे. उमेदवार/त्यांचे खर्च प्रतिनिधी/अन्य प्राधिकृत प्रतिनिधी यांनी निवडणूक खर्चविषयक लेखे,नोंदवह्या,प्रमाणके, बिल्स तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

 
Top