धाराशिव (प्रतिनिधी)-प्रसिद्ध उद्योगपती, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं वयाच्या 86व्या वर्षी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले.   जिल्हाध्यक्ष महेंद्र  धुरगुडे यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांच्यासोबत रतन टाटा यांना पुष्पहार अर्पण करून, मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली.

सामाजिक जाणीवेतून आपल्या यशाचा राजमार्ग घडवणारे व्यक्तीमत्व,जगभरात  कामगिरीतून भारत देशाचा नावलौकीक वाढवणारे टाटा समूहाचे अध्यक्ष उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. देशावर येणाऱ्या नैसर्गिक किंवा मानवी  संकटावर मात करण्यासाठी सदैव बांधिलकीचा हात देणे हा रतन टाटा यांचा स्वभाव कायमस्वरूपी स्मरणात राहील. त्यांचे कार्य , विचार आणि योगदान पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून कार्य करतील.भारताचे सुपुत्र, पद्म विभूषण रतन टाटा यांच्या निधनाने एक महान उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रातील आदर्श नेतृत्वाने आज जगाचा निरोप घेतला आहे.

 रतन टाटा यांना  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धाराशिव उस्मानाबाद च्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करतो. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!‌‘ असे जिल्हाध्यक्ष यांनी म्हटले. यावेळी  जिल्हा कार्याध्यक्ष समियोद्दिन मशायक, धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे, विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष अतुल जगताप, विद्यार्थी जिल्हा कार्याध्यक्ष प्रतीक माने, धाराशिव युवक तालुकाध्यक्ष बालाजी शिंदे,  सामाजिक न्याय शहराध्यक्ष डी.के.कांबळे, युवक शहर कार्याध्यक्ष संदीप बनसोडे, सामाजिक न्याय जिल्हा सरचिटणीस राजाभाऊ जानराव, अल्पसंख्यांक नेते जे.के दादा,चंद्रकांत लोमटे,मंगेश काटे, नागराज साबळे, शेख मुख्तार आदि पदाधिकारी उपस्थीत होते.

 
Top