धाराशिव (प्रतिनिधी)- मतदार जनजागरण समितीच्या वतीने भारतीय संविधान अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले जात असुन महिन्यातील इतर दिवशी आणि प्रत्येक 26 तारखेला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत व्याख्यान व इतर कार्यक्रम घेण्यात येत आहेत. आज रोजी शहरातील प्रियदर्शनी प्राथमिक शाळा मराठी व सुशीलादेवी प्राथमिक शाळा धाराशिव येथे प्रा.रवि सुरवसे यांचे व्याख्यान घेण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर उद्योग क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व रतन टाटा यांच्या निधना बाबत दोन मिनिटे स्तंब्ध राहुल श्रद्धांजली वाहण्यात आली. संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन करुन कार्यक्रमास सुरुवात केली. व्याख्यात्यांनी म्हटले की, पुस्तकातील धड्यासोबत भारतीय संविधानाची दहा मिनिटे का होईना माहिती दिली पाहिजे. मुलांनी भारतीय संविधान काय आहे हे समजुन घेतले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या देशाला सर्वोच्च असे संविधान दिले आहे. राज्य घटना बनवित असतांना या देशात शंभर बॅरिस्टर होते त्यातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचीच निवड त्यांच्या बुध्दिमत्तेला स्मरुन करण्यात आली. असे प्रतिपादन संविधान व्याख्याते प्रा.रवि सुरवसे यांनी व्यक्त केले.
सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलकर्णी यांनी देशभक्तीचे गीत गाऊन विद्यार्थ्यांना तल्लीन केले. तर अध्यक्ष एम डी देशमुख यांनी विद्यार्थ्यांना संविधानिक मार्गदर्शन केले. तर खामकर,शिंदे सह इतर मान्यवर यांनी देखील संविधानाविषयी मनोगत व्यक्त केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. यावेळी सामाजिक चळवळीतील तथा उद्योजक गफार भाई शेख,मतदार जनजागरण समितीचे अध्यक्ष एम डी देशमुख,सचिव अब्दुल लतिफ,उपाध्यक्ष गणेश रानबा वाघमारे, सहसचिव बाबासाहेब गुळीग, कोषाध्यक्ष शेख रऊफ,डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कारकर्ते विजय गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते योगेश कुलकर्णी,सदस्य मिरा दलभंजन,युसुफ सय्यद,गोविंद वारे,शाळेचे मुख्याध्यापक सिघीरे,व समीर पटेल सह शिक्षक कर्मचारी वर्ग विद्यार्थी उपस्थित होते. सुत्रसंचलन पठाण यांनी केले प्रस्तावना अब्दुल लतिफ यांनी तर आभार शाळेचे मुख्याध्यापक समीर पटेल यांनी मानले,