कळंब (प्रतिनिधी)-जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान वसुंधरा पायी दिंडी सोहळा 2024 श्री क्षेत्र शिमुरगव्हाण (परभणी) ते श्री क्षेत्र नाणीज धाम (रत्नागिरी)  दि. 29 सप्टेंबर ते 21 ऑक्टोबर 2024 या कालावधीत या वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहेत. या दिंडीचे आगमन धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथे मांजरा नदीच्या तीरावर दि. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता होणार आहे. या वसुंधरा पायी दिंडीचे स्वागत कळंब तालुका व जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने उत्साहात करण्यात येणार आहे. 

अंनत श्री विभूषीत जगदग़ुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज दक्षिण पीठ नानिजधाम यांच्या जन्मोत्सव  वारीनिमित्त वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीत श्रींच्या पादुका घेऊन अध्यात्म आणि सामाजिक जनजागरण करत ही दिंडी किमान पाच किलोमीटर चालून आपली सेवाभाव श्री चरणी अर्पण करण्यासाठी दिंडीत मोठ्या संख्येने भक्तगणने सामील व्हावे असे आवाहन संप्रदायमार्फत करण्यात आली आहे.  या दिंडी पर्यावरणाची करूरक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा ! अशा आशयाचे फलक घेऊन या दिंडीमार्फत ही जनजागृती केली जात आहे. ही दिंडी दररोज सुमारे 25 किलोमीटर अंतर चालत पार करणार आहे. या दिंडीचा मुक्काम कळंब तालुक्यातील परतापुर येथे दिनांक 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजता ही दिंडी येरमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात प्रस्थान करणार आहे. ही दिंडी परभणी, बीड, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशी या जिल्ह्यातून भ्रमण करणार आहे. या दिंडीसाठी वसुंधरा पायी दिंडी उत्सव समितीचे कळंब तालुका अध्यक्ष दत्तात्रेय इंगोले, सचिव विठ्ठल काटे, धाराशिव जिल्हा सेवा समितीचे अध्यक्ष संतोष केसकर, मराठवाडा पिठाचे लेफ्टनंट अरविंद मोरे, राजाभाऊ मुळीक सहआधी परिश्रम घेत आहेत.

 
Top