तुळजापूर  (प्रतिनिधी) - आश्विनी पौर्णिमेच्या पर्वणीनिमित्त मंचकी निद्रिस्त तुळजाभवानी मूर्तीची  गुरुवारी दि. 17 ऑक्टोबर रोजी सिंहासनावर प्रतिष्ठापना होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून पायी चालत येणाऱ्या भाविकांमुळे तुळजापुरात भक्तांचा जनसागर उसळला आहे. पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी लाखभर भक्त दाखल झाले. त्यामुळे तुळजापूर तीर्थक्षेत्र भक्तिरसात वाहून गेले आहे.

महाराष्ट्रासह शेजारील कर्नाटक, आंध्र, मध्य प्रदेशच्या कानाकोपयातून मोठ्या संख्येने भाविक पायी चालत येऊन तुळजाभवानी संकटमोचनी व नवसाला पावते यामुळे ऊन, पाऊस, वारा, थंडी, तहान-भूक विसरून सर्वच वयोगटातील जाती-धर्मांचे भाविक देवीवर निष्ठेमुळे पायी चालत येत आहेत. या देवी भक्तांसाठी भोजन, औषधोपचार, स्नानास गरम - पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांना दिलासा मिळत आहे. गुरुवारी पहाटे दीड 

वाजता मंचकी निद्रिस्त अवस्थेतील मूळ मूर्ती गर्भगृहातील सिंहासनावर विधिवत प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. त्यानंतर नित्योपचार पूजा होणार आहे. रात्री वर्षातील प्रमुख असा छबिना सोलापूरच्या शितलाठ समाजाच्या काठ्यांसह मंदिर प्रांगणात काढण्यात येऊन नंतर मंदीर प्रांगणात महंत तुकोजीबुवा यांनी जोगवा मागितल्यानंतर  या सोहळ्याची सांगता होणार आहे. वाढती गर्दी पाहता यंदा सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. देवी भक्तांसाठी पुजारी वर्ग, मंदिर संस्थान, न.प., आरोग्य, परिवहन, विद्युत, सा. बां. विभाग सह अन्य विभाग परिश्रम घेत आहेत.


 
Top