तुळजापूर (प्रतिनिधी)-  बसस्थानक बांधकामाला विकास निधी शासनाने माफ केला असल्याने याचा बांधकाम परवाना बाबतीत विकास निधी घेता येत नाही असा शासन जी आर असल्याची माहिती नगर परिषदने दिली.

तुळजापूर येथील बसस्थानक बांधकाम परवाना फीस बाबतीत अनेक आरोप प्रत्यारोप होत असल्याचा पार्श्वभूमीवर याची नगर परिषदकडुन अधिक माहिती घेतली असता त्यांनी वरील उत्तर दिले. नियम 124 फ. (1) केंद्र सरकार किंवा राज्य शासन किंवा कोणतेही स्थानिक प्राधिकरण यांच्याकडे सूट निहित असलेल्या किंवा त्यांच्या नियंत्रणखाली अथवा ताब्यात असलेल्या कोणत्याही जमिनीचा अथवा इमारतीचा वापर करण्यास सुरूवात करण्यावर किंवा वापरात बदल करण्यावर अथवा त्यांच्या विकासावर कोणताही विकास आकार बसवण्यात येणार नाही. असा शासन आदेश आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूर येथे नव्याने उभारण्यात येत असलेले नवीन बसस्थानकाचे काम अंतिम टप्यात आले आहे. लवकरच प्रवाशांचा सेवेसाठी बसस्थानक उपलब्ध होणार आहे.

या बसस्थानक बांधकाम बाबतीत अनेक आरोप प्रत्यारोप झाले. सदरील बांधकाम नियमानुसार असुन या बाबतीत जनतेने कुठलाही दुराग्रह मनात आणु नये असे स्पष्ट केले. सदरील बांधकाम दर्जदार व्हावे या कारणामुळे या बसस्थानकचे उदघाटन सप्टेंबरमध्ये उद्घाटन होईल असे वाटत होते. माञ आता हे उदघाटन आचार संहितेत अडकणार आहे. तो पर्यत घाईगडबड न करता हे काम अंदाजपञक नुसार केले जात आहे. भाविक, शहरवासियांच्या दृष्टीकोनातून शहरातील मध्यवर्ती बसस्थानक आहे.  


 
Top