धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात इ 7वी विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ .ए .पी.जे.अब्दुल कलाम जयंती दिनी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. 

प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे, उपमुअ प्रमोद कदम 7वी पर्यवेक्षक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख राजेंद्र जाधव यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करुन मुख्याध्यापक न्ननवरे यांनी वाचन प्रेरणादिन साजरा करण्या मागची भुमिका विशेद केली. नंतर विद्यार्थ्यांचे वाचन घेतले. या प्रसंगी सहशिक्षक भारत गवळी, अमितकुमार काकडे, शिवाजी धोंगडे, श्याम राठोड ,सुरेंद्र पडवळ, शाहजान शेख, सतिश चद्दे उपस्थित होते. सुत्रसंचालन कलाध्यापक शेषनाथ वाघ यांनी केले. तर आभार दिपक केंगार यांनी मानले.

 
Top