तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मंदीराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असणाऱ्या मलबा हाँस्पीटल जवळ असणाऱ्या टायगर गेम वर पोलिसांनी छापा टाकुन दोन जणांना ताब्यात  घेऊन त्यांच्या कडुन टायगर जुगार साहित्य व 1150 रुपये रक्कम ताब्यात घेतली.

या बाबतीत अधिक माहीती अशी कि, तुळजापूर पोलीसांनी दि.07.10.2024 रोजी 23.45 वा. सु.तुळजापूर पो ठाणे हद्दीत तुळजापूर मंदीरकडे जाणारे रोडचे उजव्या बाजूस मलबा हॉस्पीटल येथे छापा टाकला. यावेळी-ज्ञानेश्वर राजेंद्र पवार, वय 24 वर्षे,  मंगेश दत्तात्रय घाडगे, वय 23 वर्षे,दोघे रा.शुक्रवार पेठ कणे गल्ली तुळजापूर, ता.तुळजापूर जि. धाराशिव हे 23.45 वा. सु. तुळजापूर मंदीरकडे जाणारे रोडचे उजव्या बाजूस मलबा हॉस्पीटल येथे टायगर जुगाराचे साहित्यासह एकुण 1,150  रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.

 
Top