तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ महोत्सवातील होमावर धार्मिक विधी करण्यासाठी महसुल विभागाने जीवन मोहनराव वाघमारे यांची नियुक्ती केली आहे. शारदीय नवराञ उत्सवात यापुर्वी संभाजी शिंदे यांना होमावर धार्मिक विधी करण्याचा मान मिळत होता. ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तुळजापूर येथील जीवन मोहनराव वाघमारे यांना मिळत असुन यंदाचे हे त्यांचे अकरावे वर्ष आहे.
यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या स्वाक्षरीने काढलेल्या आदेश पञात आपण शनिवार रोजी दुपारी 12.00 वाजता होमावर धार्मिक विधीच्या कार्यक्रमासाठी गतवर्षाप्रमाणे जीवन मोहनराव वाघमारे (शिपाई) यांना हजर राहण्यास सुचित करणेबाबत विनंती केली आहे. करीता आपणास कळविण्यात येते की, श्री तुळजाभवानी देविजींचे शारदीय नवरात्र महोत्सव माहे आश्विन शके 1946 दिनांक 3/10/2024 ते 18/10/2024 या कालावधीतील दि 12/10/2024 वार शनिवार रोजी दुपारी 12.00 वाजता होमावर धार्मिक विधीच्या कार्यक्रमांकरीता आपण हजर रहावे.