परंडा (प्रतिनिधी)-  तालुक्यातील डोमगांव येथील बोगस रेशनकार्ड वाटपाचे रॅकेट करून शासनाच्या योजनेचा गैरफायदा घेऊन चुकीचा लाभ घेतल्या बाबत सर्व संबंधितांवर कायदेशीर गुन्हे नोंद करून शासकीय रकमेची वसुली करणे बाबतची कार्यवाही होणे बाबत दि.15 आक्टोंबर 2024 पासून  दिपक गायकवाड, अनिल गायकवाड, लक्ष्मण गायकवाड आणि माधव दाभाडे यांनी तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण बसले होते. येथील तहसीलदार यांनी उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासनानंतर नायब तहसीलदार यांच्या हस्ते उपोषण स्थगित करण्यात आले.

यावेळी तहसीलदार निलेश काकडे यांनी लेखी पत्र दिले. त्या पत्रामध्ये नमुद केले आहे की, सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आदर्श आचार संहिता लागू झालेली आहे. सदरील प्रकरणात आदर्श आचार संहिता कालावधी पूर्ण झाल्यानंतर आपल्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. असे आश्वासन दिले.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा येथील संचालक विजय बनसोडे, फुले आंबेडकर विव्दत सभा महाराष्ट्र राज्य समन्वयक डॉ. शहाजी चंदनशिवे, माजी सरपंच मनोहर मिस्कीन, तानाजी पाटील, पोलीस हवालदार बळीराम शिंदे, पोलीस अंमलदार भुजंग अडसूळ, अशीष ठाकूर, सोमनाथ मिस्कीन, महादेव खरात,हवालदार गायकवाड आदी उपस्थित होते.

 
Top