धाराशिव (प्रतिनिधी) - व्ही.पी.शैक्षणिक संकुलामधील एस.पी. पॉलिटेक्निक आणि व्ही. के. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये अभियंता दिन आणि नूतन विद्यार्थी स्वागत समारंभ सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील हे होते तर व्यासपीठावर  नगरसेवक अक्षय ढोबळे, स्टॅंडर्ड उद्योग समूहाचे अध्यक्ष्य पृथ्वीराज गायकवाड, सुकर्मा कॅपिटलचे आशिष पवार , निखिल पाटील, अक्षय घोडके, एसबीएन फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ.सूरज नन्नवरे हे उपस्थित होते. 

यावेळी डॉ प्रतापसिंह पाटील म्हणले की, भारताला जगामध्ये वेगळा ठसा उमटवयाचा  असल्यास आपल्या देशामध्ये चांगले अभियंते तयार होणे गरजेचे आहे . आपला देश जगामधील सर्वात तरुण देश आहे. त्या मुळे सर्व जग भारताकडे आशेने बघत आहे. तसेच देश औद्यगिक क्रांतीकडे जाताना त्या देशामधील अभियंते हे देश पुढे घेवून जात असतात.त्यामुळे आजच्या ह्या आर्टिफिशियल इंटेलीजन्सच्या काळामध्ये सर्व होणाऱ्या भावी अभियंत्यानी मेहनत घेवून चांगला अभ्यास करून पुढे जाणे गरजेचे आहे . यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला तसेच नूतन विद्यार्थ्यांना पेन आणि गुलाब देवून त्यांचे महाविद्यालामध्ये स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालाचे प्राचार्य अमर कवडे यानी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सय्यद सर, घव्हाने सर, साखरे मॅडम, कांबळे मॅडम, माळी मॅडम यांनी प्रयत्न केले. या वेळी महाविद्यालामधील सर्व विभागप्रमुख, शिक्षक उपस्थित होते .

 
Top