धाराशिव (प्रतिनिधी) - डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. प्रशांत दीक्षित यांनी प्रतिमा पुजन करून पुष्पहार अर्पण केले. कमवा व शिका योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.
याप्रसंगी ग्रीन क्लब विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
प्रा. डाॅ. विनोदकुमार वायचळ, विभागप्रमुख, हिंदी विभाग, व्यंकटेश महाजन महाविद्यालय, धाराशिव तथा जिल्हा समन्वयक, ग्रीन क्लब, धाराशिव यांनी ग्रीन क्लब चळवळी विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.व्हाय वेस्ट ॲप चा उपयोग करून पाणी बचत व उर्जा बचत करण्याचे आव्हान त्यांनी केले. दैनंदिन पाणी बचत नोंदी ॲपवर करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
ग्रीन क्लब स्थापनेचा मुख्य उद्देश नैसर्गिक संसाधने आणि नैसर्गिक पर्यावरणाचे संवर्धन करणे, पर्यावरण पुरक पर्यावरणाची निर्मिती करणे, जैवविविधता संवर्धन, स्थानिक पर्यावरण विषयक जागृती निर्माण करणे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डाॅ. प्रशांत दीक्षित यांनी अध्यक्षस्थान भुषविले. जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख तथा ग्रीन क्लब समन्वयक डाॅ. नितीन पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास सुक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ. राहुल खोब्रागडे, शिक्षणशास्त्र विभागप्रमुख डाॅ. मनिषा असोरे, कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ. गोविंद कोकणे, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डाॅ. मेघश्याम पाटील, जितेंद्र शिंदे, डाॅ. महेश्वर कळलावे, डाॅ. गणेश शिंदे, चंद्रकांत आनंदगावकर, संजय जाधव, अशोक लोंढे, महेेश कोकाटे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, सिद्धेश्वर नेटके सर्व विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.