धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजूरी मिळावी यासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय धाराशिव येथे पत्र दिले होते. या पत्रानुसार मंजुरी आदेश देण्याकरिता दयानंद चव्हाण यांनी 25 हजार रूपयाची लाच मागितली व ती  स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला जेरबंद केले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सुरक्षा रक्षक नेमण्यासाठी मंजुरी मिळावी यासाठी एक पत्र जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय धाराशिव यांच्याकडे सभापती यांच्या स्वाक्षरीने दिले होते. दयानंद चव्हाण याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 50 हजार रूपये लाच रक्कमेची मागणी करून तडाजोडी अंती 25 हजार रूपये स्विकारण्याचे मान्य केले. सदरची लाचेची रक्कम पंचासक्षम दयानंद चव्हाण याने स्विकारली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक करून आनंदनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. सापळा परिवेक्षन अधिकारी पोलिस उपाअधिक्षक सिध्द्राम म्हेत्रे,  सापळा अधिकारी म्हणून लाचलुचपत विभागाचे नानासाहेब कदम, पोलिस अंमलदार सिध्देश्वर तावसकर, आशिष पाटील, नागेश शेरकर आदी काम केले. 

 
Top