परंडा (प्रतिनिधी)-ओबीसी चे धडाडीचे नेते व भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष दत्ताभाऊ सोनटक्के यांची भारतीय जनता पार्टी ओबीसी विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस सुजित परदेशी, भाजपचे ज्येष्ठ नेते एडवोकेट कुदळे, परंडा तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, परंडा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष मनोहर पवार, नागनाथ नरोटे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.