धाराशिव (प्रतिनिधी)-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा इन्वीटेशन क्रिकेट स्पर्धा-2024 करिता 19 वर्षाखालील राज्य संघ निवडीसाठी धाराशिव जिल्ह्याच्या 19 वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट संघाची निवड चाचणी सोमवार, दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता येरमाळा-बार्शी रोडवरील सहारा क्रिकेट मैदान शिराळा येथे होणार आहे.
निवड चाचणी करिता 01/09/2006 ही कट ऑफ डेट जन्म तारीख आहे. निवड चाचणीकरिता जन्म तारखेचा दाखला, अपडेट केलेले आधारकार्ड, खेळाचे संपूर्ण किटसह हजर रहावे. निवड चाचणीकरिता 500 रुपये शुल्क ठेवण्यात आलेले आहे. जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी सहभाग नोंदवावा असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा क्रिकेट असोसिएशन धाराशिवचे अध्यक्ष विजय दंडनाईक व सचिव दत्ता बंडगर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी माहितीसाठी रिहाज शेख (9284538703), युवराज पवार (9921897965) यांच्याशी संपर्क साधावा, असेही जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कळविण्यात आले आहे.