भूम (प्रतिनिधी)- माजी आमदार राहुल मोटे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला.
त्यानंतर भूम येथील नगर पालिकेसमोरील चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे व शरद पवार आणि आम्ही मिळून येत्या चार तारखेपर्यंत उमेदवारीचा तिडा नक्की सोडवू असे भूम जाहीर सभेत जयंत पाटील बोलत होते. सीना कोळगाव प्रकल्पासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सरकार असताना परवानगी दिली. शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही, या सरकारने कांद्याला भाव नाही, मोठमोठे उद्योग गुजरातला नेतात. महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडला आहे .महाराष्ट्रातल्या तरुणांना त्यामुळे रोजगार मिळत नाही. मात्र आमचे मुख्यमंत्री शिंदे म्हणतात की त्याच्यापेक्षा मोठे उद्योग आम्ही आणू. ते आता मोदींना जाब विचारू शकत नाहीत. लाडक्या बहिणीचे पैसे याच सरकारने आता बंद केले यांनीच केले आणि आमच्या नावाने ओरड करतात. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर या सर्व योजना बंद करतील असा अपप्रचार महायुतीच्यावतीने सध्या सुरू आहे. आमच्या बहिणी घराच्या बाहेर गेल्यावर व्यवस्थित घरी येतील का ? आमच्या बहिणी सुरक्षित आहेत का? असे यावेळी जयंत पाटील म्हणाले. यावेळी माजी आमदार राहुल मोटे, वैशाली मोटे, तसेच इतर महाविकास आघाडीतील नेत्यांची मनोगते यावेळी व्यक्त केली. यावेळी मधुकर मोटे, रंणजीत मोटे, संजय पाटील, राजेंद्र घरत, रुपेश शेंडगे, सिराज मोगल, विनोद नाईकवाडी, हनुमंत पाटोळे, सतीश सोन्ने उपस्थित होते.