धाराशिव (प्रतिनिधी)- शाहु नगर येथील महिला भगिनी यांच्या वर्षावासातील समारोपाचा कार्यक्रम शाहु नगर येथील नालंदा बुध्द विहारात संपन्न झाला. तिन महिन्यातील वर्षावासाच्या कार्यकाळात बुध्द वंदना सह बौध्द धम्म यावरती मार्गदर्शन आणि मिलिंद प्रश्न याचा अभ्यास करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात पुज्यणीय भंते सुमेधजी नागसेन, प्रज्ञाबोधीं यांच्यावर पुष्प वृष्टी करण्यात आली. तथागत गौतम बुद्ध, विहारातील छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, शाहु महाराज, भगतसिंग अण्णा भाऊ साठे सह इतर महापुरुषांच्या प्रतिमेला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तर बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली. भंन्ते यांना चिवरदान करुन भोजनदान देण्यात आले. शिला ताई चंदनशिवे, मिरा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. तर पुज्यणीय भंते सुमेधजी नागसेन आणि भंन्ते प्रज्ञाबोधी यांनी धम्मदेसनात म्हटले की, पंचशिलेच पालन करणे म्हणजेच बौध्द धम्माचा प्रसार होय. महिलांनी मिलींद प्रश्न याचे वर्षावासातील महिन्यात वाचन करुन जीवनातील निवडक अशा बाबींवर चिंतन केले. वर्षावासानंतर भिक्खुंना कडक असे चिवरदान केले आलेल्या मान्यवरांचे स्वागत महिला भगिनी यांच्या हस्ते करण्यात आले. यात महिला भगिनी मिरा शिंदे,कल्पना कांबळे, शिलाताई चंदनशिवे, काजल गायकवाड, शिला पवार, सुनिता सिरसाठ, छाया कुचेकर, आशा हजारे, आज्जी सिरसाठ, संगिता गायकवाड, वर्षा शिंगाडे, जयश्री चंदनशिवे, संगिता नागटिळक, वैशाली जगताप, सिता साळवे, अनिता घाडगे, नंदा कांबळे, सुषमा शिंगाडे तर अंकुश उबाळे, बापु कुचेकर, संपतराव शिंदे, धनंजय वाघमारे, अनुरथ नागटिळक, गणेश वाघमारे,बलभीम कांबळे, रमेश कांबळे, बापु सोनटक्के, मारुती पवार, सिद्राम वाघमारे, सुधिर गायकवाड,सह अन्य इतर उपस्थित होते.सुत्रसंचलन ॲड.अनुरथ नागटिळक तर आभार कल्पना कांबळे यांनी मानले.