भूम  (प्रतिनिधी)-  डॉ.राहुल घुले अधिकृतरित्या तानाजी सावंत गटातून बाहेर पडत असल्याचे व राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिल्यास किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचे डॉ. राहुल घुले यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.

रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी डॉ. घुले यांनी पत्रकार परिषद घेतली. ऑगस्टमध्ये डॉ. राहुल घुले यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पुणे येथे तानाजी सावंत गटात प्रवेश केला होता. परंतु अवघ्या दोनच महिन्यात सावंत गटामधून बाहेर पडत विधानसभा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यांना प्रवेश घेतल्यापासून कोणत्याही प्रकारची जबाबदारी दिली नसल्याचे त्यांनी सांगितले. मानसन्मान देखील दिला नसल्यामुळे सर्वांना गटातून बाहेर पडून सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेच्या आखाड्यात उतरून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी लढत राहीन असे यावेळी त्यांनी सांगितले. मी सर्व समाजासाठी काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. घुले सांवत गटातून बाहेर पडल्यामुळे सावंत गटाला एका प्रकारे धक्काच असल्याचे बोलले जात आहे. डॉ. राहुल घुले यांनी गेल्या एक वर्षापासून भूम, परंडा, वाशी मतदारसंघात आरोग्य विभागात मोफत शस्त्रक्रिया करून व मतदार संघातील वयोवृद्ध नागरिकांना काठ्या देऊन या भागात मदतीचा हात दिला होता.


 
Top