भूम (प्रतिनिधी)- बापाचा फोटो भिंतीवर लागल्यावर तुम्ही कोणत्याही देवाच्या पायावर कोट्यावधी रुपये ठेवले आणि माझा बाप मला वापस दे म्हणून कितीही टाहो फोडला. तरी कोणताच देव तुमच्या बापाला वापस जिवंत करू शकत नाही. यामुळे जिवंत पणी आपल्या बापाची पूजा करा व त्याला खाली मान घालावी लागेल असे कृत्य करू नका. बापा एवढी उंची झाली आणि बापाची चपल यायला लागली म्हणून बापा समोर काही नालायक अवलाडी दारू पिऊन येऊन ज्ञान द्याला लागतात. परंतु बापाने जेवढ्या वेदना सोसल्या आहेत तेवढ्या वेदना आपण कधी सोसल्या का याचा विचार आजची पिढी करत नाही . ज्याला बाप कळाला आशा माझा संभाजी महाराज याना वयाच्या 32 व्या वर्षी 39 दिवस साकळ दंडा मध्ये बांधून ठेवले. आणि औरंगजेब यावेळी संभाजी महाराज यांना म्हणतो. तुला मी जीवनदान देतो. तू केवळ मला तुझ्या वडीलाचे स्वराज्य दे. त्या त्यावेळेला मृत्यूच्या दारात उभे असूनही छत्रपती संभाजी महाराज त्याला उत्तर देताना म्हणतात या शरीराचे तुकडे तुकडे जरी केले तरी चालतील. परंतु हा शिवपुत्र तुझ्यासमोर झुकणार नाही कारण मला माझा बाप कळालेला आहे. असे प्रतिपादन वसंत हंकारे यांनी शिवाजी नगर मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या व्याख्यान माले मध्ये केले.
ते पुढे बोलत असताना म्हणाले जो बाप वीस वर्ष तळ हातातल्या फोडा प्रमाणे आपल्या मुलीला जपतो मोटे करतो. तीच मुलगी कॉलेज मध्ये जाताच दोन तीन महिन्याच्या मैत्रीवर व लांडग्याच्या वृत्ती असणाऱ्या मुलावर विश्वास ठेऊन विष वर्ष ज्या बापाने माझा लेकरू म्हणून प्रेम केले. त्याला खोटे प्रेम म्हणत तुम्हाला काय कळते माझा व माझा प्रेमाच्या मध्ये यायचे नाही असे दम देऊन सांगते. व एका लांडग्या सोबत प्रेम विवाह करते. अवघे सहा महिने हे प्रेम चालते आणि पोरीनो तुमच्या देहाचे लचके तोडून तुमच्यावर ज्या पोराने प्रेम केले होते. त्याचे मन भरले की. ती तुम्हाला सोडून देतो.मग पुन्हा तुम्हाला तुमचा बाप आठवतो आणि बाबा मला माप करा अस म्हणत तुम्ही घरी येता. एवढे होऊनही तुमचा बाप तुम्हाला घरात घेतो. याला बाप म्हणतात असे म्हणताच उपस्थित मुली हुंदके देऊन मोठ्याने रडू लागल्या. जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे तो पर्यंत आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा आणि त्यांच्यावर देवा प्रमाणे देह वेडे होऊन प्रेम करा. असे वसंत हंकारे म्हणाले यावेळी उमेश माळी, निलेश वीर ,सागर गायकवाड, कृष्णा चौरे,मधू भारती,सूरज पवार,रवी लोंढे,ऋतिक वीर, बाळासाहेब वाघमारे, आबासाहेब मस्कर,चंद्रमणी गायकवाड, अजित बागडे,संतोष सुपेकर,तानाजी सुपेकर,पाशा शेख, मुकुंद वाघमारे,आदित्य लोंढे,तनु लोंढे, नितीन माळी, शशिकांत माळी,धैर्यशील लोंढे,बालाजी काळे, निलेश भारती यांच्या सह गुरुकुल,गुरुदेव,रवींद्र व विवेकानंद शाळेचे व क्लासेसचे विद्यार्थी विशेष महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अलीम शेख यांनी मानले.