तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञ उत्सवातील व्हीआयपी पास मधील भ्रष्टाचारा संदर्भात कार्यवाही करण्याची मागणी पुजारी मंडळाने श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहे.
मंदिर संस्थानकडुन नवरात्र महोत्सव 2024 म्हणजेच दि. 03/10/2024 ते संपेपर्यंत किती पास विक्री करण्यात आले. त्याची संख्या आणि पितळी दरवाजा मधुन व्हीआयपी सोडताना तपासणी करण्यात आलेल्या पासची संख्या, न्हानीगेट पासची संख्या आणि मेनगेट, पितळी दरवाजा, अभिषेक हॉल प्रवेश देताना पास तपासणी करुन सोडणे. तसेच जामदारखाना दरवाजा, महादेव मंदिरकडीत दरवाजा, दर्शन मंडप येथुन सोडण्यात आलेले व्हीआयपी या ठिकाणाचे सर्व सीसीटीव्ही फुटेज दिनांक 03/10/2024 ते आजपर्यंतचे मिळावेत. त्याची रक्कम मंडळ भरण्यास तयार आहे. या व्हीआयपी पास प्रकरणात संबंधितांची चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच पुजारी बांधव त्यामध्ये आढळुन आल्यास त्यांच्यावरही कवायत प्रमाणे कार्यवाही करुन मंदिर प्रवेश बंद करण्यात यावा. तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर तसेच यापुढे नवरात्र काळात व्हीआयपी पास पुर्णपणे बंद ठेवण्यात यावे, सर्वसामान्य भक्त हे 4 ते 8 तास रांगेत उभारुन दर्शन घेतात. पैसे देणाऱ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात येतो हे योग्य नाही. व्हीआयपी पास प्रकरणाची चौकशी करुन कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. सर्व फुटेज मिळावे त्याचे पैसे भरण्यास आम्ही तयार आहोत. फुटेज न मिळाल्यास व संबंधीतावर कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने नवरात्रा नंतर आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.