भूम (प्रतिनिधी)-श्री गुरुदेव दत्त हायस्कूलचे शिक्षक किरण रामहरी जाधव यांची महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर बोर्डच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थेचे सचिव व पर्यवेक्षक देशमुख, अध्यक्ष व्यंकटराव मोटे हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्ता भालेराव, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक कल्याणराव मोटे, शाळेचे माजी पर्यवेक्षक भाऊसाहेब सलगर व कवयित्री प्राध्यापिका अलकाताई सपकाळ यांची उपस्थिती होती.