धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बावी येथील असंख्य युवकांनी तसेच अंबेहोळचे उपसरपंच सरफराज शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहचवून शिवसेना संघटना बळकट कराल,असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.