धाराशिव (प्रतिनिधी)- विकसित भारतामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचा फार मोठा मोलाचा वाटा असून, या मध्ये नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित होत आहे. याचाच एक भाग म्हणून येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागातील विद्यार्थ्यांनी आकार 2024 कार्यक्रम आयोजित केला. त्यासाठी मेघ पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि त्यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

आकार 2024 कार्यक्रमासाठी न्यायाधीश म्हणून गिरी, रंधिवे, रोंगे आणि नाईकनवरे यांनी प्रत्येक उपक्रमाचे न्यायनिवाडा केले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून उत्कृष्ट प्रकल्पांची निर्मिती केली व उत्तमरीत्या संक्षिप्त स्वरूपात उद्दिष्ट, परिणाम आणि महत्त्व स्पष्ट केले.

या कार्यक्रमात मॉडेल प्रेझेंटेशनमध्ये नवीन तंत्रज्ञान आणि तांत्रिक संकल्पनांचे सादरीकरण केले, पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये विविध विषयांवरील संशोधनाचे संक्षिप्त स्वरूपात मांडले, रील प्रेझेंटेशनमध्ये रचनात्मक, प्रभावी आणि नाविन्यपूर्ण कल्पना तयार केल्या आणि क्विझ स्पर्धेत वेगवेगळ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली.

या कार्यक्रमात आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत धाराशिव जिल्ह्यातील इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता.

प्रत्येक इव्हेंटनंतर जजांकडून गुणांकन करण्यात आले आणि अंतिम निर्णय एकत्रितपणे जाहीर केला. त्याच वेळी विजेते आणि उपविजेते यांनी आकर्षक पदके आणि प्रमाणपत्रे मिळवून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर प्रमुख अतिथी लाभलेले गिरी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी सॉफ्ट स्किल म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास आणि डोमेन म्हणजे विशिष्ट क्षेत्राशी संबंधित तांत्रिक माहिती किती प्रमाणात असावी हे स्पष्ट केले. या कार्यक्रमात शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांनी  चे उद्घाटन करून कमिटी सदस्यांना त्यांचे बिल्ले देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

पोस्टर प्रेझेंटेशनचे उपविजेते दिक्षा लाटे आणि श्रेया कोलपे आहेत. तर द्वितीय उपविजेते नम्रता गव्हाणे आणि प्रीती घोगरे आहेत. आणि प्रथम पुरस्कार सई आखाडे आणि स्नेहल गदाडे यांना मिळाला आहे. मॉडेल प्रेझेंटेशनचे उपविजेते सृष्टी हजगुडे आणि स्नेहा सूर्यवंशी आहेत. तर प्रथम पुरस्कार किर्ती कोरके आणि ऋतुजा कुरुंद यांना मिळाला आहे. रील प्रेझेंटेशनचे उपविजेते शौर्या पवार, नम्रता गवाणे, प्रीती घोगरे आणि श्रद्धा पाटील आहेत. तर विजेते नेहा धारूरकर, साई सूर्यवंशी, स्नेहल गदाडे, आणि साई आखाडे आहेत. शेवटी, क्विझ स्पर्धेचे उपविजेते भूमी गायकवाड आणि दिक्षा लाटे आहेत. तर प्रथम पुरस्कार प्रीती घोगरे यांना मिळाला आहे. अखेर मेघ पाटील यांनी सर्व सहभागी, उपविजेते आणि विजेत्यांचे कौतुक करून भविष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top