धाराशिव (प्रतिनिधी)- मंगळवारपासून शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात मुलांमधून छत्रपती संभाजीनगर संघाने तर मुलींमधून मुंबई संघाने वर्चस्व प्रस्तापित करत विजेतेपद पटकाविले आहे. यजमान लातूर विभागाच्या दोन्ही संघास उपविजेतेपदावर समाधान राहावे लागले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेतील अंतिम सामने रात्री उशिरापर्यंत स्पर्धेस रंगात आणणारे ठरले असून मुलांच्या अंतिम सामन्यात छत्रपती संभाजी नगर विभागाच्या संघाने लातूर विभाग संघावर 3 - 0 गुणाने विजय प्रस्तापित केला. तर मुलींच्या अंतिम सामना मुंबई विभाग विरुद्ध लातूर विभागात झाला. यामध्ये पहिला सेट मुंबई संघाने जिंकला. नंतर लातूर विभागाने 2 रा व 3 रा सेट जिंकल्यानंतर यजमान संघाचे मनोबल वाढले. स्पर्धेवर पकड ठेवत शेवटचे 2 सेट जिंकत मुंबई संघाने विजेतेपद पटकाविले. मुंबई विभागाच्या संघास विजेतेपद पटकावून देण्यास मृणाल आगरकर महत्वपूर्ण ठरली.

 
Top