तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूर - अक्कलकोट रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. हे कमी की काय म्हणून काटेरी झुडपे मोठे होवुन त्याचा काटेरी फांद्या थेट गाड्यांपर्यत पोहचत असल्याने हा रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे.
सध्या श्रीतुळजाभवानी मातेचे शारदीय नवरात्र उत्सव चालु असुन, लाखोच्या संखेने भाविक श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ खाजगी गाड्यातुन येत आहे. राञी प्रवास करताना ना खड्डे, ना काटेरी झुडपे दिसत नसल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे.
शारदीय नवरात्र पुर्वतयारी बैठकीत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट सुचना दिल्या होत्या. तसेच पालकमंत्री तानाजी सावंत यांनी ही भाविकांची गैरसोय मला जमणार नाही अशी ताकद देवुनही पुनश्च रस्त्यावर खड्डे पडून साईड पट्यावरील झाडे झुडपे वाढून त्याचा ञास गाडीतील भाविकांना होत आहे. आता या प्रकरणी पालकमंञी, जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. तिर्थक्षेञ तुळजापूरहुन भातंब्री-मंगरुळ मार्ग नादुंरी पर्यतच्या रस्त्यावर मोठ-मोठे आकाराचे खड्डे पडले आहेत. तसेच रस्ताकडेला साईड पट्यावरही झाडेझुडपे वाढुन ते थेट रस्त्यावर येत असल्याने गाडीचा काच उघडला कि हे काटेरी झुडपाचा फटकारा प्रवाशांना बसत आहे.
या रस्ता वरील दुरुस्ती खर्च जातो कुठे?
या रस्ता दुरुस्ती दरवर्षी होते. दुरुस्ती होताच एक-दोन पावसात या रस्ताची वाट लावते. मग दुरुस्तीसाठी जाणारा खर्च कुठे गायब होतो? असा सवाल करुन मुदती आधी रस्ता खराब झाल्यास अभियत्यांच्या पगारीतुन दुरुस्ती खर्च वसुल करण्याची मागणी होत आहे.