धाराशिव (प्रतिनिधी)-  68 व्या धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण तर नियोजित जागेतील पिंपळ वृक्षाखाली (बोधी वृक्ष) तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करून बुध्द वंदना घेण्यात आली. यावेळी श्रामणेर भिक्खु संघाच्या वतीने तथागताच्या मुर्तीस वंदन केले. यावेळी अंकुश उबाळे, बापु कुचेकर, धनंजय वाघमारे, बाबासाहेब बनसोडे, गणेश वाघमारे, प्रा.रवि सुरवसे, इतिहासकार रविंद्र शिंदे, संपतराव शिंदे, स्वप्नील शिंगाडे, सरवदे मामा, विजय गायकवाड, पुष्पकांत माळाळे, रमेश कांबळे, अनुरथ नागटिळक, स्वराज जानराव, मेसा जानराव, अतुल लष्करे, धिरज बनसोडे, शिंदे, ,बाळासाहेब माने, शशीकांत गंगावणे,सोहन बनसोडे,राजभाऊ कदम सह अन्य उपस्थित होते.

 
Top