धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथील साई श्रद्धा एज्युकेशनच्या वतीने 2024 या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा नीट ऑनलाइन टेस्ट सिरीजच्या पाचव्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाळासाहेब भोसले स्पेशल ऑडीटर वर्ग एक तर प्रमुख पाहुणे म्हणून  विशाल सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री साई श्रद्धा एज्युकेशनचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांनी प्रस्तावना करताना श्री साई श्रद्धा एज्युकेशनने बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये करत असलेल्या बदलाबाबत व चार वर्षात एकूणच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्याबाबत माहिती सांगितली. तसेच गोर गरीब विद्यार्थ्याला नीट ऑनलाइन टेस्ट सिरीज सोबतच अत्यंत माफक दरामध्ये मुलींचे वस्तीगृह सुद्धा उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. या नीट ऑनलाईन टेस्ट सिरीजचा स्वतःच्या मुलापासून सुरू केलेला प्रवास आता 16 जिल्ह्यापर्यंत पोहोचलेला आहे, हेही यावेळी आवर्जून सांगितले. 

त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  विशाल सूर्यवंशी यांनी श्री साई श्रद्धा एज्युकेशन वैद्यकीय क्षेत्रातील पूर्व परीक्षा नीटमध्ये करत असलेल्या प्रगतीबद्दल तसेच संस्थेचे संचालक प्रा. सोमनाथ लांडगे यांच्या सामाजिक कार्याबद्दल अतिशय गौरवपूर्ण उल्लेख केला. तसेच नवीन वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीस शुभेच्छा देऊन भविष्यात वैद्यकीय व्यवसाय करताना सुद्धा सामाजिक भान जोपासण्याचे आवाहन केले. 

कार्यक्रमाचा समोर करत असताना बाळासाहेब भोसले यांनी बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांने स्वतःमध्ये बदल करून घ्यावा व आव्हानाला सामोरे जावे. तसेच आई वडील करीत असलेल्या कष्टाचे भान ठेवून स्वतःच्या विकासासोबतच राष्ट्र निर्माणाला सुद्धा अग्रगण्य स्थान द्यावे असे विद्यार्थ्यांना आव्हान केले. यावेळी बोलत असताना भोसले म्हणाले प्रा. सोमनाथ लांडगे यांना मी कॉलेज जिवणापासून पाहतोय. अत्यंत गरिबीचे जीवन जगत जगत शिक्षण घेत असलेल्या हा व्यक्ती आजही या काळात जशाला तसाच मला दिसतोय. याचाही आपल्या भाषणामध्ये त्यांनी उल्लेख करून संस्थेच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी एमबीबीएस, बीएएमएस, बीडीएस महाविद्यालयात प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर येथे प्रवेशित झाल्याबद्दल प्रथम गांधी, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव येथे प्रवेशित झाल्याबद्दल जानवी गरड, मुस्कान पठाण, अंजली कांबळे, तसेच इतर बीएएमएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल श्रेया भंडारे, निकिता गुंडरे, श्रीनिवास गिरी, काकडे नेहा, अपर्णा सुरवसे, भक्ती चौधरी, कल्याणी बचुटे, आगळे सानिका, ढेकणे वैष्णवी, पडवळ अमिषा, वाघमारे श्रावणी, गौरी ढवळे, तेजल तवले, एकता भोसले, सोनाली चित्राव, सुप्रिया भोसले, मानसी देडे, वैष्णवी कोरे व मुलांमध्ये श्रेयस गंगथडे, प्रवीण सावंत, सागर भक्ते व संघर्ष मस्के या विद्यार्थ्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पालकांमध्ये विक्रम गरड, हरिश्चंद्र गुंडरे, अशोक कांबळे, सादिक पठाण, उत्तम काकडे, गणेश गंगथडे, नामदेव भाकरे, अनिल सुरवसे, संतोष चौधरी, बाळासाहेब सावंत, प्रमोद बचुटे, नेताजी आगळे, बालाजी भक्ती, अरुण ढेकणे, अनिल पडवळ, शशिकांत कोठावळे, सुरेश वाघमारे, धनराज ढवळे, रामानंद तवले, संताजी भोसले, राजकुमार मस्के, साधू भोसले हे पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका उषाताई लांडगे, पत्रकार प्रशांत सोनटक्के, श्रद्धा लांडगे, वस्तीगृहामधील विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संस्थेचे संचालक श्री नागेश गोटे सर यांनी सर्व विद्यार्थी, पालक, प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीबद्दल आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 
Top