तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवातील आठव्या माळेदिवशी दुर्गाष्टमीदिनी गुरुवारी दि. 11 ऑक्टोबर रेजी देविजींच्या
सिंहासनावर महिषासूर मर्दीनी अलंकार महापूजा मांडण्यात आली.
या पुजे बाबतीत अधिक माहिती अशी की, साक्षात पार्वती असणाऱ्या जगदंबा तुळजाभवानी मातेने दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला. त्यामुळे महिषासूर मर्दिनी ह्या स्वरुपात देवीची अलंकार पूजा बांधण्यात येते. दुर्गाष्टमीदिनी होमकुंडावर पारंपरिक पद्धतीने वैदिक होमविधीस सकाळी 7 वाजता यजमान जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे व त्यांच्या पत्नीच्या हस्ते होमहवनास आरंभ झाला. याचा सांगता यजमानांच्या हस्ते कोहळ्याची पुर्णाहुती देवुन झाला. होमावरील विधीचे पौरोहित्य उपाध्ये पाठक यांच्यासह शहरातील ब्रम्हवृंदांनी केले. गुरुवारी राञी मोर वाहनावर छबिना काढण्यात आली. नंंतर महंत तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळपुजा केल्यानंतर दिवसभरातील नवराञोत्सवातील धार्मिक विधाचा सांगता झाला.