धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील आठही तालुक्यात जुने 42 नविन 57 महसुल मंडळे अस्तीत्वात आली आहेत. परंतू जिल्ह्यातील 42 मंडळामध्येच पर्जन्यमापक असल्याने 15 मंडळामध्ये पर्जन्यमापक अस्तीत्वात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व 57 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे 50 टक्केपेक्षा जास्त खरीप पिकाचे नुकसान झालेले आहे. त्याच प्रमाणे फळ पीके, भाजीपाला व कांदा याचे देखील मोठृया प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या सर्व पिकांची नुकसान भरपाई शासनाने येत्या दोन दिवसात मंजूर करुन वितरीत करावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

2023 च्या खरीप विम्याबाबतीत काढलेले परिपत्रक रद्द करुन शेतकऱ्यांना 2023 चा विमा देण्यात यावा. तसेच 2024 चा खरीप पीक विमा मंजूर करुन त्याचे 25 टक्के आग्रीम मंजूर करुन शेतकऱ्यांना त्वरीत देण्यात यावेत. राज्य सरकारने घोषीत केलेल्या प्रतीलिटर 7 रुपये अनुदान शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही ते त्वरीत देण्यात यावे. कृषी खात्याअंतर्गत ठिबक, स्पींकलर व शेती अवजाराचे रुपये 22 कोटी अनुदान मागील दोन वर्षापासून रखडले आहे ते त्वरीत देण्यात यावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील टेंभूर्णी लातूर चौपदरीकरणाचे काम त्वरीत चालु करावे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण व धाराशिव शहरातील रस्त्याची कामे व खड्डे बुजविण्याची कामे त्वरीत पूर्ण करावीत. अन्यथा येत्या दोन दिवसात राज्य शासनाच्या विरोधात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगांवकर यांनी दिला आहे.

 
Top