धाराशिव (प्रतिनिधी)- येथील माणिक चौक परिसरात वास्तव्याला असणाऱ्या आणि निःसीम देवीभक्त कमल रावण साळुंके (वय 82 वर्ष) यांचे वृद्धापकाळाने 16 ऑक्टोबरला दुःखद निधन झाले.
कमल साळुंके यांनी, माणिक चौकामध्ये देवी मंदिर स्थापन करून भाविकांमध्ये धार्मिक वातावरण निर्माण केले. साप्ताहिक धुम्रवर्णचे संपादक बाळासाहेब साळुंके यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर उस्मानाबाद येथील कपिलधार स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात 1 मुलगा,3 मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. धाराशिव येथील पत्रकार, मित्र परिवार यांच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.