तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीतुळजाभवानी मातेच्या दर्शनार्थ मंगळवारी दि. 22 ऑक्टोर रोजी प्रचंड गर्दी झाली होती. आज लाखभर भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
मंगळवार पहाटे एक वाजल्या चरणतिर्थ होवुन धर्म दर्शनास प्रारंभ झाला. पहाटे पासुन भाविकांचे थवे मंदिरात येत होते. आज मंदिर भाविकांनी भरुन गेले होते. देवी दर्शनानंतर भाविकांनी बाजार पेठेत गर्दी केल्याने बाजार पेठ भाविकांनी गजबजुन गेली होती. आज दर्शन रांगा भाविकांनी भरभरुन गेल्या होत्या. राञी मंदीर प्रांगणात छबिना मिरवणूक काढण्यात आली. आज शहरात सर्वत्र वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने याचा त्रास भाविकांना बसला.