धाराशिव (प्रतिनिधी)-  तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवात आज 5 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई श्री तुळजाभवानी देवीजींची नित्योपचार पूजा करण्यात आली. शारदीय नवरात्राची आज तिसरी माळ आहे. 

आज पहाटे सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत देवीजींची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली.पारंपरिक पद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज नियमित विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता श्री देवीजींची छबिना मिरवणूक सिंह या वाहनातून काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

 
Top