धाराशिव (प्रतिनिधी)-  संचालक, संचालनालय लेखा व कोषागारे, मुंबई यांच्या आभासी बैठकीतील निर्देशानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी आपल्या कार्यालयातील देयके जिल्हा कोषागार कार्यालयाकडे 24 ऑक्टोबरपर्यंतच सादर करावीत.असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे यांनी केले आहे. 

24 ऑक्टोबरपर्यंतच सर्वांनी आपले वेतन देयके,उत्सव अग्रिमाची व निवृत्तीवेतनाची देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे वेतन वेळेवर करणे सोईचे होईल.26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार आहे. त्यामुळे यादिवशी कोणतेही देयक कोषागारात स्वीकारले जाणार नाही. त्यामुळे वेतन देयकास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आहरण व संवितरण अधिकारी यांची राहणार आहे, याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी. असे जिल्हा कोषागार अधिकारी अर्चना नरवडे यांनी कळविले आहे.

 
Top