धाराशिव (प्रतिनिधी) - खरीप हंगामातील पीक विमा रक्कम मंजूर करण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील सोयाबीन खरेदी केंद्राच्या अटी शिथिल करून प्रत्येक तालुक्यात 5 ते 7 केंद्रांना मंजुरी देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्याकडे दि.11 ऑक्टोबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून अतिवृष्टी व सततच्या पावस झाल्यामुळे सोयाबीन व खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक विम्याची अग्रीम रक्कम मंजूर करण्याची परिस्थिती निर्माण झाली असून ती तात्काळ मंजूर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग कण्यात यावी. तसेच खरेदी केंद्र वर प्रत्येक शेतकऱ्याने फक्त 16 क्विंटल सोयाबीन विक्री करण्याची मर्यादा घातली आहे. ती उत्पन्न मर्यादा रद्द करून उत्पादित सर्व सोयाबीन खरेदी करण्यात यावी. विशेष म्हणजे सोयाबीनला भाव नसल्यामुळे गेल्या वर्षीचे सोयाबीन शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत विकले नसून ते घरात ठेवलेले आहे. त्यामुळे करीत केंद्र सुरू झाल्यानंतर जुने व नवे नवीन सोयाबीनची तात्काळ हमीभावाने खरेदी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, मराठवाडा युवा अध्यक्ष गोरख मोरे, तानाजी पाटील, संपत्ती काळे, शिवाजीराव ठवरे, बालाजी पारेकर व संजय पाटुळे आदी उपस्थित होते.