धाराशिव (प्रतिनिधी)-  एआयसीटीई- एम आय सी विद्यार्थी  नियोजित उपक्रमामध्ये तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथील महाविद्यालय स्तरावर समाज उपयोगी नवकल्पना घेऊन महाविद्यालयाचे 240 विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रकल्पांचे परिक्षण महाविद्यालयाचे तज्ञ प्राध्यापक यांनी केले.

यावेळी प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रयोगाचे परिक्षण करताना ते म्हणाले, विद्यार्थांमध्ये नेहमीच नवनवीन संकल्पना असतात, त्यामुळे देशातील सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक प्रश्नांची उत्तरे मिळतात. फक्त त्यांना व्यासपीठ मिळणे गरजेचे असते. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्मार्ट ऑटोमेशन, हेरिटेज कल्चर, आरोग्यविषयक, शेतीविषयक, दळणवळण, पर्यटन अशा विविध विषयांवर मांडणी करावी अशी विद्यार्थ्यांकडून अपेक्षा होती. या अपेक्षेला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी ऑटोमेशन क्रॉप प्रोटेक्शन सिस्टीम म्हणजेच मानवी श्रम आणि अवकाळी पावसापासून फळबागांचे संरक्षण  यासाठी नवीन प्रकल्प डेव्हलप करून पर्यावरण पुरक प्रकल्पाचे कसे नियोजन करता येईल याचा विचार करून प्रयोग केले. हर्बल ड्रग प्रिपरेशन, कोरोना काळात पॅथॉलॉजी लॅबची गरज आणि त्यावर पडलेला अतिरिक्त ताण लक्षात घेता ऑनलाइन पॅथॉलॉजी लॅब ही एक नवीन संकल्पना विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रयोगातून मांडली.

त्यादृष्टीने खेड्यातील शिक्षण पद्धतीसाठी ऑनलाईन सॉफ्टवेअरचा वापर करून वेगवेगळे प्रयोग करण्यात आले.

तेरणा महाविद्यालयाच्या नियमित परंपरेनुसार समाज उपयोगी नवकल्पना शोधण्याच्या उपक्रमामुळे महाराष्ट्र इनोव्हेशन चॅलेंज या स्पर्धेमध्ये सुद्धा महाविद्यालयाने प्रत्येकी एक  लाखाची दोन बक्षीस मिळवली असून अविष्कार, बिजनेस इनोव्हेशन कॉन्टेस्ट तसेच वेगवेगळ्या कंपन्यांकडून आयोजित केलेल्या आयडिया कॉन्टेस्ट यामध्ये  विद्यार्थी सक्रिय सहभाग घेऊन सक्रिय सहभाग नवीन कल्पक कल्पना सादर करत आहेत. त्यामुळे महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक स्कूटर, मानवी रोबोट व ऑटोमॅटिक ड्रिप इरिगेशन सिस्टम यासारखे नवीन प्रकल्प तयार झालेले आहेत. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-2024 कॉर्डिनेटर डॉ. सुशीलकुमार नाथराव होळंबे, को कॉर्डिनेटर प्रा. रवींद्र गुरव, प्रा.डी. बी. ठाकूर, प्रा.डी. बी. भक्ते, प्रा.बालाजी चव्हाण, प्रा. आर.ए.काळे, प्रा.आर. बी. ननवरे या सर्वांनी कार्यक्रमासाठी पूर्ण परिश्रम घेतले.

 
Top