धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत, के .टी. पाटील संगणकशास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात दिनांक 02 ऑक्टोबर 2024 रोजी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती महाविद्यालयात साजरी करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजित मसलेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरात मधील पोरबंदर येथे झाला. 2 ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन देशभर 'गांधी जयंती' म्हणून साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये या दिवशी गांधीजींचे स्मरण केले जाते.

सत्य आणि अहिंसेचे व्रत जन्मभर जपणाऱ्या गांधीजींचे विचार प्रेरणादायी होते. भारताचा स्वातंत्र्य लढा देखील त्यांनी याच मार्गाने दिला. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव देशातील नव्हे तर परदेशातील अनेकांवर पडला. आज महात्मा गांधी जयंती निमित्त त्यांचे काही सहज, सुंदर आणि थोर विचारांची पुन्हा एकदा उजळणी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा. शुभम पाटील, प्रा. मुंढे, प्रा. पटेल, प्रा.बढे, अजय शिराळ, शिवकुमार सुरवसे, राजाभाऊ जाधव, मुंढे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.


 
Top