येरमाळा  (प्रतिनिधी)- आई राजा उदो उदो च्या जयघोषाने येरमाळा नगरी दुमदूमून गेली असुन आज आश्विनी कोजागिरी पौर्णिमेनिमीत्त  श्री.येडेश्वरी देवीच्या कोजागीरी पौर्णिमा महोत्सवानिमित्त  रविवारी दि.१७ रोजी रात्री नऊ वा.देविच्या तांदळावर शोभणीय चंद्राची महापुजा काढण्यात आल्यानंतर पुजारी व मानकरी यांच्या हस्ते विधिवत मंत्रौपचार पुजा,महाआरती करण्यात आली . देविचा पालखीसह छबिना काढण्यात आला . अशाप्रकारे येडेश्वरी देवीचा कोजागीरी पौर्णीमा शारदीय नवरात्र  महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊन शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता कऱण्यात आली.

कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीण  म्हणून ओळख असणाऱ्या आई येडेश्र्वरी देवीच्या नवरात्र  महोत्सवातील आज अश्विन पौर्णिमा निमित्त दि १७ गुरूवारी  रात्री नऊ वा. कोजागिरी पौर्णिमेनिमीत्त देवीची विधिवत महाआरती करण्यात आली व देवीस आवड असलेल्या नागवेली च्या व बकाड्या लिंबाच्या पानाने देवीच्या तांदळावर बारवाची विधिवत महापुजा मांडण्यात आली . रात्री नऊ वाजता देविचे मानकरी अमोल पाटील व यशवंत पाटील, पुजारी यांच्या हस्ते पौर्णीमेनिमित्त देविस महापंच्चौपचार महापुजा, महाआरती केल्यानंतर पालखीसह छबिना काढण्यात आला यावेळी आराधी गाण्याचा मेळा,भारुडाने मंदीर परिसर भक्तगणाने दुमदुमुन गेला होता तसेच देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी,पुजारी मंडळीकडून पोत खेळण्यात आला.


 
Top